आपला लेख वाचला . तो नेहेमीप्रमाणे चांगला आहे. स्पष्ट करून सांगण्याची आपली पद्धतही
चांगली आहे. मला एक प्रश्न पडतो (म्हणजे मी जेव्हा अध्यार्मिक लिखाण वाचतो तेव्हा) की माणसाला सर्व ज्ञान असूनही त्याचा उपयोग
तो आचरणात का करीत नाही. माझ्या मते (मला फारशी माहिती नाही) माणूस ज्ञान आणि आचरण यातील दरी नाहीशी करण्याचा
प्रयत्न करीत नाही. मग तो ज्ञानाला बाजूला सारून जीवन प्रवाहात पडत असावा. जन्म , मृत्यू आणि जीवन याबद्दल माहिती नसलेला
माणूस विरळाच. अगदी अशिक्षित माणसालाही तर्काने आयुष्यातला फोलपणा कळत असावा. यावर काय उपाय आहे ? आपलं मत
अवश्य सांगा. म्हणजे एखादा नवीन विचार सुचू शकेल.