शिवाजीचा पहिले पेशवा शामराजपंत म्हणून होते. जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध स्वारी अयशस्वी झाल्याने त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांच्याजागी शिवाजीने मोरोपंत पिंगळे यांना पेशवा केले. तेच अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान म्हणून होते. शिवाजीच्या मृत्यूनंतर ते संभाजीवर पन्हाळ्याला चालून गेले. संभाजीने त्यांचा पराभव करून तुरुंगात टाकले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा थोरला मुलगा निळो मोरेश्वर याला संभाजीने पेशवा केला. संभाजीला अटक झाली त्यावेळी निळो मोरेश्वर दूर राजस्थानात होता. जवळ असता तर कदाचित संभाजीला योग्य सल्ला मिळून तो वाचला असता असे सरदेसाईंचे मत दिसते. राजारामाच्या काळातही तो पेशवा असावा. पुढे शाहूच्या काळात त्याचा धाकटा भाऊ बहिरू मोरेश्वर पेशवा होता, त्याच्यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशवा झाला.
विनायक