मूळ चर्चा बघा: 'मला तरी जी/ काका (अजून बाबासुद्धा नाही हो मी ) वगैरे म्हटलेलं आवडत नाही. तुम्हाला काय वाटतं?'
या विषयावर इतका कलगीतुरा होण्यापेक्षा विजय देशमुखांनी 'मला विजय म्हणा' असं जाहीर केलं असतं तर ते फार सोपं झालं असतं.
आपण स्वतःला शरीर समजत असल्यामुळे शरीराचं वय होणं म्हणजे आपलं वय होणं असं आपल्याला वाटतं आणि मग आपण ते लपवायला सुरुवात करतो पण ते कसं लपवता येईल?
मी जर मध्यम वयीन असेन तर माझ्या मित्रांची मुलं मला काय म्हणतील? ते काकाच म्हणणार आणि मी कितीही सांगीतलं तरी ते मला 'आहो संजय' अशी अवघड हाक कशी मारतील?. बरं हे माहितीतल्या लोकांचं झालं, तुम्ही सार्वजनीक ठिकाणी काय करणार? तुम्ही केस रंगवत नसाल तर एखादं लहान मूल तुम्हाला आजोबा देखील म्हणेल! स्त्रीया या बाबतीत पुरुषांपेक्षा जास्त सेंसीटीव्ह असतात. कुणी आपल्याला काय संबोधावं हे त्याच्या हातात असतं आपण स्वतःला काय समजतो यानी सर्व फरक पडतो.
या शिवाय संबोधन हे फक्त लक्ष वेधण्यासाठी किंवा निर्देश करण्यासाठी आहे हे समजलं की झालं त्यावरून इतकी सविस्तर चर्चा?
संजय