आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

भयपट हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्यातले काही सांकेतिक संकल्पनांनाच नव्याने पडद्यावर आणून प्रेक्षकांची `पैसे वसूल` करमणूक करण्याचा प्रयत्न करतात, काही दृश्य चमत्कृती अन् तांत्रिक सफाईवर विसंबून प्रेक्षकांना थक्क करतात, काही पडद्यावरल्या भीतीप्रद दृश्यांना समाजाच्या तात्कालिन परिस्थितीला समांतर जाणारे सांकेतिक अर्थ देण्याचा प्रयत्न करतात, तर काही मनुष्यस्वभावातलेच गडद कोपरे शोधून आपल्यापुढे आरसा धरतात. माझा अनुभव आहे, की या चौथ्या प्रकारच्या चित्रपटांत आपल्याला अस्वस्थ करण्याची सर्वाधिक ताकद असते. मग पडद्यावरल्या घटना कितीही साध्या ...
पुढे वाचा. : टेरिबली हॅपी- भयपट!