सुधीर कांदळकर साहेब,
मी आपल्याला प्रथमच प्रतिसाद लिहित आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुमचं लिखाण पहिल्यांदाच वाचलं. मी तुमचा रेग्युलर वाचक आहे. प्रतिसाद नं लिहिण्यामागची दोनच महत्त्वाची कारणं म्हणजे काही मोकळा वेळ असूनही केलेला लिहिण्याचा आळशीपणा आणि काही वेळेस खरोखरी कामात व्यस्त असणे. आज तुमचा लेख वाचून राहवलं नाही. ऑफीस लंच ब्रेक मध्ये सरळ लिहायला सुरुवात केली.
फारच सुरेख व्यक्तिरेखा आपण उभी केली आहे. मी स्वतः ठाणेकर आहे. अशा देवदूताची ठाणेकर असूनही मला माहिती नाही हे माझं दुर्दैवं. माहिती असेलही कदाचीत पण या घडीला आठवत नाही. आपण माणसांना कोणकोणत्या प्रकारे उपयोगी पडू शकतो हे या देवदूताकडून शिकण्यासारखं आहे. पुढील भागाची आतूरतेनं वाट पाहात आहे.
आपला नम्र. दिलसे.