श्री . संजय , आपल्या लेखाचा पुढचा भाग मी वाचलेला आहे. आपलं मत आपण चांगल्या
रिती ने दिले आहे. परंतु आपल्या प्रस्तुत लेखाला आलेला "टवाळा आवडे विनोद " हा योगप्रभूंचा प्रतिसाद फारच आवडला. त्यांनी
अशा प्रकारच्या रचना जर आणखीन केल्या असतील तर त्या स्वतंत्रपणे लिहाव्यात एकप्रकारचा "रिलिफ " वाटतो. त्यांची शैली
वि. आ. बुवा. यांच्या शैलीसारखी आहे. त्यांनी वेगळे लिहिल्यास वाचायला नक्कीच आवडेल. आपल्याला दिलेल्या
प्रतिसादात हे लिहित आहे त्याबद्दल माफ करा. बरेच वर्षांनी असलं लिखाण वाचनात आलं. एक आठवण आहे. वि. आ. बुवांनी त्यांच्या
गीतेवरील लेखात " आणि तेवंती चार्जुन " याचा अर्थ, " अर्जुना, अरे तू तर चार जूनचा. " असं भगवंतांच्या तोंडी घातले आहे. असो.
हे विषयांतर ठरेल.