अनाकलनीय येथे हे वाचायला मिळाले:
कामाच्या व्यापातून बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाला होता. भटकंतीचा किडा वळवळायला लागला होता. एका दिवसाचा ट्रेकचा विचार होता. पण भटकायचे कुठे ?? मागच्याच आठवड्यात मल्हारगडाची मुसाफिरी करून आलो होतो. मेंदूवर जास्त दबाव न देता प्रतापगडावर जायचे पक्के केले. आकाश निरभ्र निळे होते. शनिवार होता त्या दिवशी. सकाळीच घरून निघालो. कात्रजवरून महाबळेश्वरला जाणारी एस.टी पकडली. कंडक्टरणे शंभराचे तिकीट फाडले थेट महाबळेश्वर. कालच पर्फोमन्स अप्रैजल भरून साहेबाला एकदाचे देऊन टाकले होते त्यामुळे आज बराच रिलीफ वाटत होता. गाडीत मोकळी जागा अजिबात ...