मजेदार ...
मजा आली वाचून .... सोबत मुळचे अर्थ दिले तर अर्थाचा काय अनर्थ होवू शकतो हे अजून कळेल.
संस्कृत मला काहीही कळत नाही. पण कुठेतरी (बहुदा मनशक्ती) वाचलेला किस्सा आठवतो.
एका राजाला संस्कृत यथातथाच येत असतं. (आमच्यासारखं) एकदा तो तलावात विहार करत असताना, त्याच्या राणीच्या अंगावर पाणी उडवतो, ते पाहून राणी त्याला म्हणते, "मोद क ताडयेन" (काहीतरी गडबड झाली... चुभुदेघे). राजा त्याचा सोयिस्कर अर्थ काढतो "मोदक ताडयेन" म्हणून मोदकाचे ताट बोलावतो. ते पाहून राणी व इतर दासी हसू लागतात.
पुढे हा राजा संस्कृत भाषेचा पंडित झाल्याचे ऐकवते. (पण आम्ही झालो नाही, करण आमच्या राणीला संस्कृत येतच नाही )
वर दिलेले संस्कृत श्लोक माझ्या स्मृतीवर आधारित असल्याचे त्यात भयंकर चुकांची खात्री आहे. त्या दुरुस्त करून वाचाव्यात.