चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:

माध्यमिक शाळेत असताना, आपण सर्वांनी गणिताच्या पुस्तकांचा, ती कितीही अप्रिय वाटली असली तरी सामना केलेलाच असतो. आता चीनमधले विद्यार्थी वापरत असलेल्या अशा पुस्तकांचा, चीनचे माजी चेअरमन माओ यांच्याशी बादरायणी संबंध तरी कसे लावणे शक्य आहे? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु माध्यमिक शालेय गणित आणि चेअरमन माओ यांचा संबंध आहे, अगदी घनिष्ठ संबंध आहे हे माओच्या कालातल्या गणितांच्या पुस्तकांवर एक नजर टाकली तरी समजते. आता त्या कालात चीनमधे घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा माओशी संबंध जोडला जात असेच! मग गणिताची पुस्तके तरी त्याला ...
पुढे वाचा. : चेअरमन माओ आणि शालेय गणित