पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:
तुम्ही ऑफिसला गेल्यावर घरचा कम्प्युटर बंद असतो असा समज करून घेऊ नका. आजकाल वडीलधाऱ्या मंडळींपेक्षा मुलेच जास्त कम्प्युटर वापरतात. त्यांनी त्याचा गैरवापर करू नये म्हणून कम्प्युटर लॉक करून जाणे अथवा त्याला पासवर्ड देणे असे उपाय आपल्याला करता येतात. परंतु, काही वेळा शाळा, कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी अथवा ऑफिसच्या कामासाठी मुलाला खरोखरच कम्प्युटरची गरज असते. तरीही आपले मूल खरोखरच कामासाठी कम्प्युटर वापरते आहे की भलतेच काही पाहण्यासाठी हे तुम्हाला कसे ओळखता येईल? मुलांनी आपल्या गैरहजेरीत कम्प्युटर किती वेळ वापरला हे कसे ओळखाल? ते ओळखता येईल. अगदी ...