इतकच की जसं सुचलं तसं ते झर झर,तत्काळ उतरवून काढणं गरजेचं वाट्लं.अन्यथा कित्येक मुद्दे, पंचेस सुटले असते.
तसा मूळ मसुदा इतरत्र लिहून होताच तो इकडं चढवला. मात्र इथं शक्यतो शुद्धलेखनाची काळजी घ्यावी लागते. त्यामुळं पूर्ण लिहिलेला मसुदा हाताशी असलेला कधीही सोपा पडतो( शु चि च्या हवाली करायला). अन्यथा शुद्धलेखनाच्या नादात कंटेंट वरून लक्ष हटण्याचा माझा अनुभव आहे.
थोडक्यात काय, तर मनोगतावर चढवावं ते इथल्या नियमात बसणारं आणि अधिकाधिक शुद्ध असावं असा माझा प्रयत्न असतो.
आणि लिखाणातला ताजेपणा, उत्स्फुर्तता टिकवताना ते प्रमाण भाषेतही असावं ह्यासाठी जिथलं जे वैशिष्ट्य(feature) उत्कृष्ट होतं ते वापरायचं ठरवलं, ज्यायोगे आपोआपच लेखन त्या त्या ठिकाणच्या नियम आणि संकेतात बसेल.
माझ्या अंदाजाप्रमाणं मी दिवसभराच्या अवधीतच सर्वत्र लेखन सुपूर्त केलंय, अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचायला.
असो, प्रकाशित केलंत,वाचलंत, त्याबद्दल आभार.