प्रतिसादा बद्दल धन्यवाद,
(आभारी)केशवसुमार
पॅराग्लायडींग करता जास्त चढाई करायला लागत नाही, पेद्रो बोनीतावर बऱ्याच वर पर्यंत गाडी जाते असे ऐकून आहे.. ह्या विकांताला कळेलच.
(आशावादी)केशवसुमार
जालावरती फावेला वर बरीच माहिती उपलब्ध आहे. काही लोकांनी फावेला टूर ही सुरू केल्या आहेत.. सामान्य ब्राझीलीयन लोक ही त्या बाजूला फिरकत नाहीत, आमच्या सारख्या परदेशी लोकांची तर बातच सोडा.. असे ही रिओ हे खूप असुरक्षित शहर आहे.. ड्रग आणि हत्यारे तस्करीचे मोठे जाळे ह्या फावेलातून आहे.. रोज पोलीस चकमकी चालू असतात. काही भागात तर पोलिस ही जाऊ शकत नाहीत असे म्हटले जाते. सिटी ऑफ गॉड हा चित्रपट जमल्यास बघा
(भित्रट)केशवसुमार