नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:
मग कृत्रिम श्वासावर असलेल्या आणि निश्चल पडून असणा-या व्यक्तीला जे होतं ते एकेक कॉम्पलिकेशन सुरु झालं. आयसीयू मध्ये सर्व औषधांना सरावलेले भयानक जंतू असतात. त्यातला एक भयानक जीवघेणा जंतू… त्याचा संसर्ग श्वासाच्या पाईप मधून होऊन तिला न्युमोनिया झाला. अशा स्थितीत न्युमोनिया म्हणजे ब-याच आशा एकदम नाहीशा झाल्या..दिवसेंदिवस सिरीयस स्थिती होऊ लागली.
एक दिवस अचानक तिचे डोळे फिरले आणि श्वास बंद झाला. अगदी म्हणजे अगदी योगायोगानं मामा नेमका त्याच वेळी आयसीयू च्या आत तिच्यावर ओझरती नजर टाकायला गेला होता. त्यानं ताबडतोब धावपळ करून तिला ...