माझ्या विश्वात... येथे हे वाचायला मिळाले:
संध्याकाळचे साधारण सात वाजले असतील, रीतु तिच्या अलिशान बंगल्याच्या बेडरूममध्ये एकटिच होती. तिशीतली रीतु दिसायला फारच सुंदर होती, साडेपाच फुट उंची, बांधेसूद शरीरयष्टी, गोरा वर्ण, लंब गोल चेहरा, आणि बोलके पिंगट टपोरे डोळे. सिल्कचा शॉर्ट कुरता, जीन्स आणि त्यावर सोडलेले मोकळे केस अशा पेहेरावात ती एकदम मोहक वाटत होती. नुकताच टिव्हीवरील एक इंग्रजी चित्रपट संपवून ती बेडरुमच्या खिडकीत उभी होती. हातात वाफाळणार्या कॉफिचा मग घेऊन ती बंगल्याच्या मागच पावसाळी दृष्य न्याहाळत होती. बाहेर आकाश छान दाटून आल होत, आभाळात ढगांची नुसती रेलचेल झाली होती. ...