ही अशीच आहे. भल्याभल्यांना गरगरवणारा हा वेग आहे. जीवनशैलीचा दर्जा कधीं हरवतो तें कळतही नाहीं. पण व्यावसायिकता म्हणजे काय हें मुंबई सोडल्याशिवाय कळत नाहीं.
मुंबईबाहेरची अवस्था पाहा. उद्यां येतो म्हणून सांगणारा माणूस दोनचार दिवसानंतर कधींही उगवतो. आमचा गॅरंटीतला गीझर दुरुस्त करणारा पुणेकर माणूस एक दिवस हीटर बसवून गेला. मग म्हणाला थर्मोस्टॅट गेला. उद्यां आणून बसवतो. मग दोनतीन दिवस आलाच नाहीं. मुंबईबाहेरच्या सामान्य माणसाला दुसऱ्याच्या वेळेची अजिबात किंमत नसते आणि आपल्या नांवाचीही. हडतुड केल्यावर बरोबर कामें करतात. मुंबईबाहेरचे फक्त उच्चपदस्थ कार्यतत्पर असतात. सामान्य माणूस हा असाच. प्रत्येक बाबतींत हें असेंच घडतें. सरकारी कार्यालयें, खाजगी आस्थापना, व्यापारी, सगळे असेच. म्हनून मग इथले उच्चपदस्थ लोक (माझ्यासारखे
) उच्चपदस्थ सोडून सामान्य माणसांना कमी लेखून वागणूक देतात.
सुधीर कांदळकर