तुमच्याच एका लेखातील उत्तरात तुम्ही म्हणाला होतात की तुमच्याकडे बरेचसे कवितासंग्रह आहेत. या मालिकेतील काही कवींच्या रचना फार जुन्या आहेत. त्यांना कॉपीराईट ऍक्टनुसार (बहुदा) ६० वर्षांनंतर कोणीही प्रसिद्ध करू शकतो, म्हणजे त्यांवर कोणा एकाची मालकी राहत नाही. त्यानुसार, ह्या कविता जालावर उपलब्ध करून देता येईल का? कदाचित मदतीसाठी  काही मनोगतीही तयार होतील  . परदेशी असणारे मनोगती यांसाठी मदत करू शकत असतील, तर मीही त्यांत एक असेल.  . जसे इंग्रजी वांङमय (चुकलं वाटते) जालावर उपलब्ध आहे, तसच मराठीही उपलब्ध असावं, असं मला वाटते. अर्थात हे वेळ घेणारे काम आहे. असो.

तुमची लेखमाला वाचत आहे. कवितेचा संदर्भ माहीती असला तर तीचं सौंदर्य अधिक वाढतं, हे या लेखातून (किमान मला) समजते.

पुढील लेखनास शुभेच्छा !