ध्रुवपदः
गं प्रियतमे - गं प्रियतमे
हृदयाजवळ तुझ्याऽ वाटे - मज ऱ्हावेसे
तू न उपस्थित ज्यात असा - मेळा न दिसे ।ध्रु।
टीप : मला दुसऱ्या ओळीचे दोन अर्थ शक्य वाटले होते.
अर्थ १. तू ज्या मेळ्यात दिसत नाहीस असा मेळा नाही. (म्हणजे मला जिथे तिथे तू दिसतेस.)
अर्थ २. तू ज्या मेळ्यात दिसत नाहीस तो कसला मेळा!
अर्थ १ प्रमाणे भाषांतर वर दिलेले आहे. अर्थ २ प्रमाणे भाषांतर :
हृदयाजवळ तुझ्याऽ ग असे - मज ऱ्हायाचे
तूच उपस्थित नाहिस ते - मेळे कसचे ।ध्रु।
पैकी मला आधी दुसरा अर्थ जास्त योग्य वाटत होता; पण मिलिंदपंत आणि निरंजनपंताची भाषांतरे पाहिल्यावर मला अर्थ १ घेऊया असे वाटले.
पाठभेदः
मिलिंदपाठ :
गे प्रेयसी
गे प्रेयसी
तुझ्या काळजासमीप असे उद्दिष्ट ते माझे
मैफिल अशी नसे जिथे अस्तित्व ना तुझे
निरंजनपाठः
ग प्रियतमे.. ग प्रियतमे
तव हृदयासमीपच माझे मथुरा नि काशी
कोणती ती मैफिल जमली जित तू नसशी