बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा


हे अंगाईगीत मी विसरणे शक्य नाही. मात्र हे कवी दत्त ह्यांचे आहे हे माहीत नव्हते. माझ्या आईला आणि मावशीला हे अंगाईगीत तोंडपाठ होते आणि ते त्या कायम म्हणायच्या. ऐकून ऐकून मलाही त्यातल्या ओळी यायला लागल्या होत्या. (अर्थात माझ्या नव्हे तर मावसबहिणीच्या लहानपणी! )
आम्ही जेथे राहत होतो, त्या बिऱ्हाडाच्या तक्तपोशीतून माती पडू नये म्हणून पत्रे ठोकलेले होते. त्यावर उंदरांची खुडबूड कायम ऐकू येई.
त्यामुळे
खुडबुड हे उंदिर करिती
कण शोधाया ते फिरती
ह्या ओळी चांगल्याच लक्षात आहेत.