माझा जन्म आणि जन्मानंतरची १७ वर्ष मुंबईत गेली.
या शहराबद्दल प्रचंड तळमळ, आस्था आणि आपुलकी आहे.
पण, आयुष्य 'जगायचं' असेल, तर इथून बाहेर पडलं पाहिजे; हे समजून घेऊन 'टीनेज' मध्येच पुण्याला आलो... स्थाईक झालो.
'मुंबईत काय पडलय' असं तुच्छपणे नाही म्हणवणार... पण लेखामागचा विचार पूर्णपणे सयुक्तिक वाटतो.

मुंबई शहर छान आहे, पण पहायला, फिरायला... रहायला नव्हे. अगदी हेच मुंबईबद्दल जेवढं वाटलं, तेवढच ते न्युयॉर्कबद्दलही वाटलं.
थोडक्यात काय, ही शहरं आपल्यातला माणूस वेगळा काढतात आणि फक्त यंत्र टिकवतात.
ऑफिसातले सहकारीच इथे फक्त मित्र असू शकतात. नातेवाईकांच्या कार्यप्रसंगीच इथे त्यांची भेट होऊ शकते. रस्त्यांवरून फक्त धावावंच लागतं आणि त्यावेळी आकाशात सूर्य असण्याची शक्यता क्वचितच असते. घालवण्यासाठी नसलेला वेळ फक्त इथेच उपलब्ध होऊ शकतो. असं बरंच काही या मुंबईबद्दल सांगता येईल.

पण, वेळप्रसंगी अनोळखी हातही इथेच पुढे होतात. रोजच्या डब्यातल्या सर्व सहप्रवाशांना लग्नाचं आमंत्रणही इथेच दिलं जातं. ऑफिसला जाता जाता चपला काढून रस्त्यातूनच सिद्धिविनायकाला मनोभावे साकडं इथेच घातलं जातं. 'आज वानखेडेला आहे मॅच' हे आपल्या घरीच ती असल्याच्या अभिमानाने इथेच सांगितलं जातं. शिवाजी पार्क बद्दल सचिन, ठाकरे कुटुंबिय आणि सामन्य माणूस यांना समान तळमळ इथेच दिसून येते.

असो.
बाहेर राहूनच का होईना, पण या 'मुबईच्या जिवाला' सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

विचारांना वाट करून देणारा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद...