गीते मधील हा श्लोक मला सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो. याचे सर्वात सोपे उदाहरण आहे गायकाचे. गायकाच्या हातात फक्त चांगले गाणे असते. ते किती श्रोत्यांना आवडेल हे तो आधी सांगू शकत नाही. म्हणून त्याने केवळ गावे. संपूर्ण प्रयत्नानिशी गावे.
वर योगप्रभू म्हणतात त्याप्रमाणे 'ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान' असा याचा मुळीच अर्थ नाही . उलट जर कुणी परिणामांना घाबरून कर्म त्यागायचा विचार करत असेल तर त्यासाठी हे तत्त्वज्ञान उपयोगी पडते.
आणि मतदानाचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास 'कारभारावर लक्ष ठेवणे' हे सुद्धा एक कर्तव्य आहे.
- संजय