आठ? माझ्या स्मरणाप्रमाणें सोळा सहस्त्र एकशें आठ. एका कवीच्या कवीचें रसग्रहण करतांना दुसऱ्या कवीला - 'आयुष्यावर बोलूं काहीं' धोपटायचें प्रयोजन कळलें नाहीं. निव्वळ सोयिस्कर विषयांतर. कविता ही एक कलाकृती असते. प्रत्येक कवीचा पिंड वेगळा असतो. कुणाला आवडेल कुणाला नाहीं. कृपया आस्वाद घेणें नच जमलें तर निदान थातुरमातुर मुद्द्यावरून झोडूं तरी नये. या प्रकारें कोणालाही कोणत्याही प्रकारें झोडतां येईल. मग कवितेतील प्रतीकामुळें धार्मिक भावना दुखावल्या जाणाऱ्यांत आणि आपल्यांत फरक तो काय राहील? असो. हें टाळलें तर बरें होईल. निष्कारण वादाचे मोहोळ उठणार नाहीं. चांगल्या मालिकेला गालबोट लागूं नये हीच सदिच्छा.

काळ्यापांढऱ्या चपलांच्या प्रतीकाचा उलगडा चांगला केला आहे.

सुधीर कांदळकर