कृष्णाला खूप बायका होत्या असं सांगताना कधी एकशेआठ तर कधी सोळा सहस्र एकशे आठ हे दोन्ही आकडे सांगितले जातात. पैकी कोलटकरांनी पहिला वापरलेला असावा.

उथळपणा - म्हणजे वरवर सांगणे, खोल रूपकांचा वापर न करणे या अर्थाने आहे. तेव्हा मी त्या वाक्यात त्या दोन कवींच्या पिंडातला फरकच सांगितला आहे. एका शब्दावरून धोपटणे असा अर्थ काढून मल्लिनाथी होणं दुर्दैवी. फारतर आपल्या वाचक म्हणून असलेल्या पिंडातला फरक समजावा, ही विनंती. ते वाक्य नसलं तरी संपूर्ण लेखात काही फरक पडत नाही. तेव्हा कृपया मला बेनेफिट ऑफ डाउट द्यावा.