हे खूप भयानक आहे. नवविवाहित जोडप्यांवर लक्ष ठेवून असले प्रकार करणारी एखादी टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुबई पोलिसांबद्दल आपण जे ऐकले आहे ते वाचून आश्चर्य वाटले. यूएई मध्ये सरकारी मॅनेजरला किंवा मोठ्या माणसाला अरबाब म्हणतात. खरंतर बायकांसाठी यूएई अतिशय सेफ म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे तुम्ही विवाहीत असाल तर तुम्हाला सगळीकडे प्राधान्य दिले जाते. बसचे टिकिट काढण्यापासून ते अगदी एअरपोर्टवरील इमिग्रेशन पर्यंत, तुम्ही विवाहीत असाल तर लगेचच तेथील अरबाब तुम्हाला रेग्युलर रांगेतून स्वतःहून पुढे बोलावतात. हे मी स्वतः अनुभवले आहे.
तरीदेखील आपला लेख वाचून मन सुन्न झाले. समीरला लवकरात लवकर त्याची बायको परत मिळो ही सदिच्छा.
दिलसे.