सुधीरजी,
"हें मात्र सरसकट पटण्यासारखें नाहीं... "
मी सरसकट विधान केलेलेही नाही. ठिपकेदार यादीच्या आधी असलेल्या "मराठी संकेतस्थळांवर" व यादीनंतर असलेल्या "...अशा वारंवार दिसून येणार्या झापडबंदतेत... " वाक्यांशांकडे पहा. मराठी संकेतस्थळांवर ह्या प्रवृत्ती वारंवार दिसून येतात असे माझे निरीक्षण आहे. "वारंवार" दिसून येतात, पण केवळ ह्याच दिसून येतात असा माझा दावा नाही.