आगाऊ सूचना : हा माझा अनुभव म्हणजे केशवसुमारांच्या अनुभवाच्या ७० मिमी चित्रापुढे केवळ एखाद्या अंगुष्ठचित्राप्रमाणे आहे.
आयायटीत असताना एनसीसीच्या प्रमुखांनी पॅरासेलिंगची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी मैदानावर ते आयोजित केलेले होते. कदाचित छत्रीधारी सैनिकांना अगदी प्राथमिक तोंडओळख करून देण्यासाठी ही युक्ती वापरीत असावेत. पाठीला हवाई छत्री बांधून जीपबरोबर थोडे पळत गेले की त्या छत्रीत हवा भरून ती आपल्याला घेऊन उंच उंच जाते. थोड्यावेळाने आपल्या वजनाने आपण खाली येतो. इतका माफक अनुभव होता तरी त्यातली रोमांचकता विसरता येत नाही. छत्रीने उंचावर गेले की दूरदूरचे (आकाश निरभ्र असेल तर खाडीपुला पर्यंतचेही) दृश्य दिसते.
आम्ही पॅरॅसेलिंग करत असताना अचानक मध्येच वाऱ्यात काय फरक पडला कुणास ठाऊक. एक विद्यार्थी जो वर उचलला गेला तो खाली येईच ना! शेवटी त्याला दोघांनी (सुरक्षेसाठी जीपला बांधलेला) दोर ओढून खाली आणले!
अर्थात केशवसुमारांचा अनुभव याहून सहस्रपट रोमांचक असणार ह्यात शंका नाही.