रफाराबद्दल -
(सूर्या आणि सुऱ्यामधे ऱ्हस्व-दीर्घ सू चा फरक आहे म्हणून मुद्दाम दुसरे उदाहरण घेतले आहे. )
आर्या आणि आऱ्या (आरी चे अनेकवचन) ह्या दोन्ही शब्दांची फोड आ+र्+य्+आ अशीच होईल...मात्र उच्चारांत सूक्ष्म फरक आहे. रफारयुक्त शब्दाच्या आधीच्या शब्दावर थोडा जोर दिला जातो. आर्या म्हणताना आ वर जेवढा जोर दिला जातो तेवढा जोर आऱ्या म्हणताना आ वर दिला जात नाही. उच्चार केला कि फरक लक्षात येतो, मात्र हा फरक सूक्ष्म आहे.
-वरदा