आपण लिहिल्याप्रमाणे केळिच्या पानात किंवा आवडत असल्यास हळदिच्या पानात लपेटून जर हा पदार्थ मायक्रोवेव्ह मध्ये केला तर फारच झकास लागतो! बरेच मासे एकदम तयार करून ठेवायचे, एक वेळी दोन, तीन मासे मायक्रोवेव्ह मधून वाफवून घेता येतात - म्हणजे बरेच पाहुणे येणार असतील तेव्हा करायला मस्तच 'आयटेम' आहे!!
तसे केल्यास तेल वापरायची गरज नाही, तव्हढेच तब्येतिचे कौतुक! लगे रहो!
तसेच, तव्यात केल्यास अजून एक गम्मत करता येइल. कोळश्याचा निखारा घ्यायचा. मासा दोन्ही बाजुने शेकून झाल्यावर निखारा तव्यावर ठेवायचा, दोन थेंब तुप टाकायचे, तव्यावर झाकण ठेवायचे - जेणे करून धुर तयार होइल तो माश्यात मुरेल आणि माश्याला एक मस्तपैकी धुरकट स्वाद येइल - आवडत असल्यास करून पहा...