ह्या श्लोकाचा अर्थ इतरांप्रमाणे मीही लावायचा प्रयत्न केलाय हे वेगळे सांगायला नको. तुमचा हा लेख सामाजिक दृष्टिकोनातून होता आणि ह्याचा दुसरा भाग हा शास्त्रिय (सायंटिफिक) दृष्टिकोनातून असेल असा माझा अंदाज होता. असो. तर मी मला समजलेला अर्थ मांडायचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या अँगल नि विचार करता येईल म्हणून आकडे घालून लिहित आहे.

१) संजय, आजपर्यंत तुम्हीच तुमच्या लेखमालेतून स्पष्ट केलेली गोष्ट म्हणजे, माणसाच्या हातात आहे तो फक्त वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ हे माणसाने निर्माण केलेले काल आहेत. आपल्या हातात सदासर्वदा आहे तो फक्त वर्तमान. आणि वर्तमान हा 'फलरहित' असतो. वर्तमानात तुम्ही फक्त काम (कर्म) करू शकता. त्यामुळे 'फळ' हे कुठे पिक्चर मध्ये येतच नाही, त्यामुळे त्याची अपेक्षा धरण्याचा प्रश्नच नाही!
२) दुसरी गोष्ट, कृष्णानी गीतेत सांगीतलेला हा श्लोक खरं म्हणजे फॅक्ट आहे, त्यामध्ये गूढार्थ वगैरे काही नाहि, स्पष्ट शब्दांत काय फॅक्ट आहे ते सांगीतलय. आपलं मन ते स्विकारायला तयार होत नाही म्हणून आपण त्यात गुढार्थ वगैरे शोधत बसतो.
३) शास्त्रिय दृष्या - मुळात कर्म/काम कसं घडतं हे क्लिअर होणं आवश्यक आहे. आधी संवेदना, संवेदनांमुळे भावना, भावनांमुळे विचार, विचार प्रबळ झाले की इच्छा आणि इच्छेमुळे कर्म. हा अल्गोरिदम फिक्स्ड आहे. इच्छा म्हणजेच खरं म्हणजे प्रार्थना. आपली प्रत्येक इच्छा ही प्रार्थना असते आणि ती देवापर्यंत पोचत असते. त्यामुळे कर्म फलिभूत होतात. आता राहिला प्रश्न त्या कर्माच्या फळाचा. एखादं काम केल्यानंतर तुम्ही जर फळाविषयी इच्छा प्रकट केली तर ती देवापर्यंत पोचतच नाही कारण तसा अल्गोरिदमच नाहिये! ते विचार निरुपयोगी (युसलेस) ठरतात. म्हणूनच कृष्णाने गीतेमध्ये फॅक्ट सांगीतली आहे.

हा मला समजलेला अर्थ आहे. त्यात फारसं काही चूक नसावं असा अंदाज आहे. तुम्ही सांगालच...