असेच आणखी एक उदाहरण मी नेहमी देतो ते म्हणजे दर्या (समुद्र) आणि दऱ्या (दरीचे अनेकवचन)
ह्यात उच्चाराचा फरक खालीलप्रमाणे लक्षात ठेवता येतो.
दर्या शब्द उच्चारताना त्याची दर् - या अशी फोड होते.
दऱ्या शब्द उच्चारताना त्याची द - ऱ्या अशी फोड होते.
उच्चारातील ह्या फरकामुळे कवितेत दर्या हा शब्द आला तर त्याची फोड दर् - या अशी झाल्याने दर् चे गुरु अक्षर होते मात्र दऱ्या लिहिले असेल तर द-ऱ्या अशी फोड असल्याने, द लघुच राहतो.
असेच आणखी उदाहरण म्हणजे
लावण्याची (सौंदर्याची) आणि लावण्याची (चिकटवण्याची किंवा लटकवण्याची)
सौंदर्याची असा अर्थ असेल तेथे ला-वण्-या-ची अशी फोड होते, तर चिकटवण्याची अशा अर्थी ला-व-ण्या-ची अशी फोड होते. त्यामुळे पहिल्या शब्दात वण् हे गुरु तर दुसऱ्या शब्दात व हे लघु अक्षर आहे.