१) तुला प्रथम आलेली समज की काळ किंवा वेळ ही मानव निर्मीत कल्पना आहे एकदम बरोबर आहे, सदासर्वदा वर्तमानकाळच आहे!
...."संजय, आजपर्यंत तुम्हीच तुमच्या लेखमालेतून स्पष्ट केलेली गोष्ट म्हणजे, माणसाच्या हातात आहे तो फक्त वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ हे माणसाने निर्माण केलेले काल आहेत. आपल्या हातात सदासर्वदा आहे तो फक्त वर्तमान"....
..... "आणि वर्तमान हा 'फलरहित' असतो"... इथे मजा आहे. कर्म आणि फल एकाच प्रक्रियेची दोन टोकं आहेत ती वेगळी करता येत नाहीत, पण काल या कल्पनेमुळे ती वेगळी भासतात. प्रत्येक वीट जर प्रत्येक क्षणी बरोबर लावली तरच चांगली इमारत उभी राहाते हे उघड आहे. त्यामुळे तुम्ही वर्तमान साधला की सगळं साधतं हा मूळ सिद्धांत आहे.
२) ....."आपली प्रत्येक इच्छा ही प्रार्थना असते आणि ती देवापर्यंत पोचत असते. त्यामुळे कर्म फलिभूत होतात. आता राहिला प्रश्न त्या कर्माच्या फळाचा. एखादं काम केल्यानंतर तुम्ही जर फळाविषयी इच्छा प्रकट केली तर ती देवापर्यंत पोचतच नाही कारण तसा अल्गोरिदमच नाहिये! ते विचार निरुपयोगी (युसलेस) ठरतात. म्हणूनच कृष्णाने गीतेमध्ये फॅक्ट सांगीतली आहे"....
कर्माचा अल्गोरिदम बरोबर आहे पण देव ही वेळे सारखीच कल्पना आहे त्यामुळे प्रार्थना वगैरेचा प्रश्नच येत नाही.
कर्म सुरू होण्यासाठी, चालू राहाण्यासाठी आणि संपन्न होण्यासाठी (मग फल काहीही असो) लाखो, करोडो गुंतागुंतीच्या गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या क्षणोक्षणी बदलत असतात हे एकदा मान्य केलं की आपण निर्धास्तपणे कर्म करू शकतो
गीतेतला हा श्लोक फक्त कर्मावर एकाग्रता साधा अशा अर्थी घेतला तर तो जीवन उपयोगी ठरतो, तुला हे साधलं तरी सगळं जमलं, पण लोकांना तेच तर मान्य नाहीये!
३) असो, खरी मजा मात्र वेगळीच आहे ती पुढच्या लेखात!
संजय