मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
हा परवलीचा शब्द उच्चारण्यापूर्वीच हिंदू वाचकावर गारूड करते. मोहेंजो-दडो या अतिप्राचीन नगरीच्या उत्खननाच्या जागतिक प्रकल्पावर कादंबरीचा नायक, खंडेराव विठ्ठल हा होतकरू पुरातत्वज्ञ सप्तसिंधू प्रदेशावरील त्याचं संशोधन जागतिक परिषदेत मांडतो. या परिषदेला देशोदेशींचे रागिष्ट संस्कृतीनिष्ट, ओरिएंटलिष्ट, इजिप्तालिष्ट, मानववंशशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, प्राणिशास्त्रज्ञ, रसायनतज्ज्ञ, इंजिनीयर, मृपात्रज्ञ उपस्थित असतात. हिंदूः जगण्याची समृद्ध अडगळ, या सिद्धांताचा प्राथमिक आराखडा पहिल्या प्रकरणात नेमाडे यांनी मांडला आहे.