कारण फल हे कर्माचाच परिपाक आहे.
१) एकएक रन कढून सेंश्युरी होते. सेंश्युरी आणि रन तुम्ही वेगळे काढू शकत नाही. वेळेमुळे प्रत्येक रन, मिळालेली जीवदानं, मारलेले आणि चुकलेले स्ट्रोक्स, वेगवेगळे वाटतात. पहिल्या खेळलेल्या बॉल पासून सेंश्युरी होण्यासाठी काढलेला शेवटचा रन ही एकच प्रोसेस असते.
गीतेतला सरळ अर्थ असा आहे की तुम्ही खेळण्यावर एकाग्रता साधा, कारण कोणत्याही क्षणी तुमच्या हातात फक्त एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे आलेला बॉल खेळणं!
आता ही इतकी उघड गोष्ट आहे की तुम्ही सदासर्वदा वर्तमानात राहीलात तर तुमच्या ती सहज लक्षात येईल.
यात देव, प्रार्थना अशा कल्पनांना काही महत्त्व नाही.
पण खरी मजा अशी आहे की आपण वर्तमानात नाही आपल्याला सदैव भविष्याचे वेध आहेत म्हणून नजर कर्मा एवजी फलावर आहे आणि तेच तणावाचं मूळ कारण आहे. शरीरानी कर्म चालू आहे आणि मनानी विचार चालू आहेत! शरीर वर्तमानात आहे आणि मन भविष्यात (किंवा भूतकाळात) आहे.
वैचारिक गोंधळाचा प्रश्न मन (आणि त्याहूनही आपण) वर्तमानात नसल्यामुळे आहे. हे रोजच्या जगण्यातलं झालं, ते सोपं आहे.
२) गीतेत कर्म म्हणजे युद्ध आहे आणि म्हणून सगळ्या कर्माचा फलापर्यंत समग्र विचार आहे. तिथे मी म्हणतो ती गोष्ट सहजपणे पटण्या सारखी नाही कारण जिंकलो तरी वैषम्य आणि हारलो तर मृत्यू! त्यामुळे सगळा प्रश्न आहे.
संजय