आधीच्या लेखाचा धागा इथे पुढे चालू ठेवत आहे...

कर्म सुरू होण्यासाठी, चालू राहाण्यासाठी आणि संपन्न होण्यासाठी (मग फल काहीही असो) लाखो, करोडो गुंतागुंतीच्या गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या क्षणोक्षणी बदलत असतात हे एकदा मान्य केलं की आपण निर्धास्तपणे कर्म करू शकतो-

हेच तर मी म्हणतो आहे... हे जे तुम्ही करोडो गुंतागुंतीच्या गोष्टी म्हणताय, त्यालाच आपण सृष्टिचक्र म्हणतो (त्यात, आधिभौतिक आणि अध्यात्मिक दोन्ही आले). (त्यालाच आपण देव असे देखिल म्हणू शकतो). आता ह्या सृष्टिचक्राला आपण आपल्या विचारांचं आणि इच्छांचं इंपुट देत असतो (ह्या इंपुटलाच आपण प्रार्थना म्हणू शकतो, नव्हे म्हणतो). प्रश्न फक्त टर्मिनालॉजी आणि त्याच्या मागचा अर्थ माहित असण्याचा आहे.


योगप्रभूंचे प्रश्न,
१) पण इच्छा म्हणजे प्रार्थना आणि ती देवापर्यंत पोचते व त्यामुळे कर्म फलिभूत होतात याला शास्त्रीय आधार काय?
- हेच शास्त्र आहे, त्याला अजून कसला आधार हवाय? तुम्ही स्वतः प्रयोग करून बघू शकता.
२) मग काम केल्यानंतरची फळाविषयीची इच्छा त्याच्यापर्यंत का पोचत नाही?
- मुद्दा फळाची इच्छा हा नसून, घडून गेलेल्या गोष्टिचा विचार सतत केल्याने काहीही फरक पडत नाही हा आहे.
(फळ ह्याचा अर्थ मटेरिअलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू मधून घेतला की सगळा गोंधळ होतो. )

असो. मला ह्या गोष्टिंचा अर्थ अजून तरी इंटेलेक्च्युअली समजलाय. संजय यांच्याप्रमाणे सदासर्वदा मी अमलात आणतो अस नव्हे.