सौरभजी,

आपणास इंटेलेक्चुअली समजलेला अर्थ माझ्यासारख्या सर्वसामान्याला अजिबात समजलेला नाही. कृपया सोप्या शब्दांत तो समजाऊन द्याल का?

इच्छा म्हणजे प्रार्थना आणि ती देवापर्यंत पोचते.

मी हेच तर विचारतो आहे, की हे जर शास्त्र असेल तर वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारावर ही कृती कशी घडते, ते सांगा. मनातील इच्छा किंवा प्रार्थना कोणत्या प्रकारच्या तरंगांत रुपांतरित होतात. मेंदूद्वारे त्याचे प्रक्षेपण कसे होते? त्या लहरी पकडण्यासाठी देवाकडे कोणती यंत्रणा असते? असा प्रयोग यापूर्वी यशस्वी झाला असेल तर मग आजही आपण दूरध्वनी, भ्रमणध्वनी, उपग्रह, प्रक्षेपक ही साधने किंवा बिनतारी, ध्वनी लहरी संक्रमण, अंकीय संदेश वहन पद्धती का वापरत आहोत? केवळ मेंदूचा वापर करून इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक व्यक्तींना एकाचवेळी मूक संवाद साधता येईल का?

फळाची इच्छा नसलेली प्रार्थना कशी असते? एखादे उदाहरण द्याल का?

घडून गेलेल्या गोष्टींचा सतत विचार केल्याने काही फरक पडत नसेल तर 'इतिहासाची पुनरावृत्ती होते' हे वाक्य स्वीकारायचे का?