१) इच्छा देवापर्यंत पोहोचत नाही कारण देव हीच कल्पना आहे
२) इच्छा ही मानसिक प्रक्रिया असल्यानी तिचा एकच उपयोग आहे : तुम्ही कर्म सातत्य राखू शकता. अ डिझायर इंटिग्रेटस द डिझायरर.
३) घडून गेलेल्या घटनेचे दोन उपयोग आहेत
अ) विधायक असेल तर तुम्ही वर्तमानात तिचा माहिती म्हणून उपयोग करू शकता
ब) क्लेष कारक असेल तर तिचा तुमच्या वर्तमान उत्स्फूर्ततेवर कसा परिणाम होणार नाही हे बघू शकता
पण घडून गेलेल्या घटनेवर विचार करण्यात अर्थ नसतो
४) इतिहासाची अजिबात पुनरावृत्ती होत नाही. हे अनंत आणि अगम्य अस्तित्व एखाद्या कॅलिडोस्कोप सारखं आहे, एक पॅटर्न पुन्हा रिपीट होण्याची शक्यता संपूर्ण अस्तित्व लयाला जाऊन परत सुरू झाल्याशिवाय शून आहे! घटना दुसऱ्यांदा घडली तरी संबंधीत घटक पूर्णपणे बदललेले असतात.
संजय