पत्रलेखनासंबंधी आपले मनोगत आवडले , पत्रलेखन कालबाह्य झाले असले तरी अजूनही काही काहीवेळा पत्र लिहिण्यास माझे काही मित्र भागच पाडतात, कारण त्यांच्याकडे संगणक नाही व सायबर कॅफेत जाऊन विरोप पाठवण्याचा त्याना उत्साह नाही भारतात असताना फोन करू शकतो पण अमेरिकेतून जमत नाही.पण मी अमेरिकेत आल्यावर मी पत्र पाठवावे अशी मात्र त्यांची इच्छा असते मग काय करणार ? अशा वेळी पेन व कागद घेऊन लिहिण्याचा कंटाळा आला तरी त्यांना एक तरी मोठे पत्र पाठवावे लागतेच व अशा प्रकारे पत्रलेखनाच्या मोडलेल्या संवयीला जरा उजाळा मिळतो.संगणकावर मात्र अजूनही मोठी मोठी पत्रे मी लिहितो.