धन्यवाद महेश आणि वरदा.
लावण्याची आणिलावण्याची, यातील पहीला शब्द आपण लावंण्याची किंवा लावण्ण्याची असा लिहीला तर तो त्याच्या उच्चारशी मिळता जुळता होणार नाही का?

मराठीत आपण अनेक वेळा जोडाक्षरातील पहीले अक्षरही जोडाक्षर करतो उच्चारताना. उदा, प्रत्त्येक, प्रत्त्यक्ष, पण लिहीताना प्रत्येक प्रत्यक्ष असे लिहीतो. संधीनियमाप्रमाणे, लेखन बरोबर आहे पण उच्चार चुकीचा (असे मला वाटते).

तसाच फरक रफार आणि अर्ध्या र मधे असेल का?
दर्या ची फोड दररया (दोन्ही र अर्धे) आणि दऱ्याची दरया (र अर्धा) अशी करता येईल का? म्हणजे र फार वेळ असेल तर रफार ः-) असे म्हणता येईल.