धर्म याचा अर्थ तुम्हाला स्वतःशी एकरुप करणारी प्रक्रिया आणि ती अत्यंत व्यक्तीगत गोष्ट आहे. ज्या पद्धतीनी मला सत्य कळलं त्या पद्धतीनी मी ते मांडण्याचा प्रयत्न करीन पण इतरांना मी फक्त सांगू शकतो की हा मार्ग आहे, तुम्ही प्रयत्न करून बघा, माझा मार्ग मी त्यांच्यावर लादू शकत नाही.
जगात धर्मांधता येण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे माणसाचा न्यूनगंड! प्रत्येकाला असं वाटतं की मला कुणी तरी हाताला धरून मार्ग दाखवावा, त्यामुळे मूळात एकसंध असलेली मानवता निव्वळ मानसिक कारणांनी विभागली जाते.
राजकारणी धर्माचा उपयोग करून सत्ता टिकवण्याचं काम करतात आणि धर्मगुरू त्यांना साथ देतात, मधल्या मध्ये असंख्य लोकांचं जीवन सैरभैर होतं आणि ते स्वतःप्रत येण्यापसून वंचित राहतात.
तू म्हणतोस तशी निधर्मी धरा होण्याची शक्यता शून्य आहे कारण लोक जन्मतःच धर्म घेऊन येतात आणि संभ्रमातच जगतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपण आपला मार्ग (किंवा धर्म) शोधून स्वतःप्रत येणं आणि कितीही स्वार्थी दिसलं तरी स्वतःचं जीवन सुखी करणं!
संजय
(संपादित : प्रशासक)