वरदा आणि महेश यांनी फारच चांगल्या रीतीने स्पष्टीकरण दिले आहे.
महेश यांनी लावण्याची आणि लावण्याची मधील फरक सांगून चर्चेला लावण्यही प्रदान केले आहे. ( हे माझं ओढून ताणून!) पण ह्या लघु, गुरु उच्चारावरून आणखी एक आठवलं. 'मानसं' शब्दातील न लघु म्हटला तर 'माणसं' चं ग्रामीण बोलीतील रूप होतं. पण न जरा लांबवून म्हटला तर 'मानस' (मन) शब्दाचं अनेकवचन होतं.
(हे आठवण्याचे कारण म्हणजे मनोगतचा तळवा "मराठी माती- मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं" हे वाचून कोणीतरी विचारले होते "'मानसं' आणि 'माणसं' यात बरोबर कोणते?" असो.)