येथे घोंघावणे ही क्रिया वादळाशी संबंधित आहे असे वाटल्यावरून हे लिहीत आहे. चू. भू. द्या. घ्या.
घोंघावण्याला रोरावणे हा पर्याय सुचवावा म्हणून मोल्स्वर्थ शब्दकोशात येथे पाहिले.
घोंगावणे / घोघावणे = घो घो असा आवाज करीत वाऱ्याचे थैमान
घोंघावणे = कीटकांच्या धाडीचे थैमान
... असे अर्थ दिसले
वादळवाऱ्याच्या थैमानाला रोरावणे असा शब्द वाचनात आला होता; मात्र जालावर तो आढळला नाही.