अनिलजी खरचं छान लागेल. अगदी हॉटेल मध्ये जाऊन खाल्ल्या सारखे वाटेल. मायक्रोवेव्ह मध्ये पण चांगला होतो.

मासे कधी धूरवाले नाहीत अजून पण चिकन मटण करी बनवून तिला मी अनेकदा कोळशाचा धूर देते. कोबीचे पान किंवा वाटी मध्ये कोळशाचा निखारा ठेवून त्यावर गरम मसाला. नाही तर लवंग, दालचिनी टाकून तयार करी वर ठेवून वर साजुक तूप सोडायचे आणि लगेच झाकण लावून ५ मिनिटांनी झाकण उघडून धुरावलेले मटण चिकन खायचे.

मसाला ताक वाढताना... एका ताटलीत हा कोळशाचा निखारा ठेवावा. त्यावर आल्याचा किस, हिंग जिरे चिमूट कोथिंबीर टाकून लगोलग त्यावर काचेचा ग्लास पालथा घालायचा २ मिनिटे झाल्यावर तो सरळ करून त्यात तयार ताक वाढायचे. लगेचच पिऊन टाकायचे  :)
धुरकट स्वादामुळे ताक पिताना जाम आनंद येतो.