लेखन नेहमीप्रमाणेच उत्तम

ह्या आज येणाऱ्या पक्षकार मला आतापर्यंत टी. व्ही., वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींतून माहिती व छायाचित्रांच्या रूपात भेटलेल्या. राजघराण्याची परंपरा, एकेकाळचे बलाढ्य संस्थान, शेकडो वर्षांचा शौर्याचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळात उचललेली प्रगतीची व विकासाची पावले आणि त्या जोडीला असलेले कर्तृत्ववान, तेजस्वी व्यक्तिमत्त्व! शिवाय भारताच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या ह्या राजस्त्री प्रत्यक्षात कशा दिसत असतील, बोलत असतील ह्याबद्दल नकळत माझ्या मनात खूप उत्सुकता दाटली होती.

उत्तम भाषेचा नमुना.