१. माझ्या मना मला सांग-  जडलास तू कुणावर
स्वप्नात येउनी जो - आच्छादला तयांवर

२. हृदया तु सांग आता, जो भावले तुला ते

३. तू गुंतलास कोठे, मज सांग तू मना रे-
स्वप्नातही सतावे, येऊन 'कोण' इथवर?

४. सांग मन्मना कसा रे - जडलास तू कुणावर
स्वप्नी येऊन कोणी रे - गारुड केले तुझ्यावर

५. ए माझिया मना रे - तुज कोण आवडे रे
तो कोण निशदिनी जो - स्वप्नात येतसे रे

मज सांग रे मना तू - जडलास तू कुणावर?
कुणि मोहजाल पसरी - स्वप्नातल्या जगावर? (मूळ भाषांतर)

ह्यातली कुठली ध्रुवपदे तुम्हाला कुठल्या क्रमाने आवडली ते सांगा. (सदस्यांची नावे मुद्दाम दिलेली नाहीत)