मानवी मनाचे तीन पैलू आहेत, विचार, भावना आणि आकलन. विचार जवळजवळ नेहेमी संभ्रमात असतो कारण प्रत्येक विचार हा विरोधी विचाराची संभावना निर्माण करू शकतो. भावना एकमार्गी असते आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती तुम्हाला दुसऱ्याशी जोडू शकते. आकलन तुम्हाला विचार आणि भावनेच्या पुढे नेते, तुम्ही विचारांच्या संभ्रमातून बाहेर पडून, भावनाविवश न होता निर्णय घेऊ शकता.
व्य्यक्तीगत नियती हा घडणाऱ्या घटनांचा व्यक्तीगत दृष्टीकोनातून लावलेला अर्थ असतो. अस्तित्वगत नियती म्हणजे सगळ्या अस्तित्वाच्या अगम्य अशा बुद्धीमत्तेचे निर्णय तिथे काल हा प्रश्न येत नाही त्यामुळे सांघिक प्रयत्नांनी नियती बदलली असे वाटले तरी अस्तित्वाला जो परिणाम साधायचा आहे तोच सरते शेवटी साधला जातो. अर्थात हा परिणाम साधतांना अस्तित्वाला परस्पर विरोधी घटकातला समन्वय आणि तोल प्रत्येक क्षणी राखायला लागतो आणि या मुख्य सूत्रातून आपल्याला व्यक्तीगत जीवनात दिशा ठरवता येते.
संजय