मुळातच हिंदू जीवनशैली योग, आयुर्वेद, निसर्गोपचार अशा बाबींमुळे परदेशी लोकांना ठाऊक आहेच.
त्यात मनःशांतीसाठी कोण्या एका पद्धतीचाच वापर करा, किंवा एका प्रकारे साधना केल्यानेच देव मिळेल, किंवा गीता वा तत्सम पुस्तकात सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, त्याबाहेर काहीही असू शकत नाही, असं हिंदू तत्त्वज्ञान कुठेही म्हणत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने, कुठलेही बंधन घालून न घेता (उदा. विशिष्ट रंगाचे झगे किंवा नमस्कार-पद्धती इ. ) जीवन जगता येते.
गीता वाचली नाही, इतकंच काय ती घरी नसली तरी तुम्ही देवाच्या विरोधात नसता, उलट गीतेवर टीकात्मक लेखन करण्याचीही मुभा आहे, जी बाकी धर्मात मिळत नसावी. टीका टीकाऊवर होते, टाकाऊवर नाही. (कुठेतरी वाचलेलं इथे डकवतो
)
असो. मला हिंदू जीवनपद्धती आवडते... थेउरला पार्टी करणाऱ्यांना मात्र अमेरिकन धर्म आवडतो, हा भाग वेगळा ह. घा.