उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
विजय देशमुख यांस,
आपला "खरंच असं होऊ शकेल का?" हा प्रश्न माझ्या दृष्टीनी सगळ्यात मोठं काँप्लिमेंट आहे.
विसूनाना यांस,
आपल्याला शेवट घाईघाईनी गुंडाळल्यासारखं वाटणं साहजिक आहे. त्यांत वैद्यकीय तपशील असल्यामुळे व माझी त्या क्षेत्रातली माहिती फारच मर्यादित असल्यामुळे मला तो भाग फारसा लांबवता आला नाही. शिवाय डॉक्टर मित्रांकडून माहिती मिळवून फार वैद्यकीय तपशील टाकल्यास तो वाचकाना कंटाळवाणा होईल असंही वाटलं.
नगरीनिरंजन यांस,
विचित्र शोधकथांमध्ये वैज्ञानिक व काल्पनिक यांचं खऱ्याचा आभास निर्माण करणारं मिश्रण असतं. 'नेमबाज' मध्ये तोच प्रयत्न केलाय.