तुमची कोडी सोडविण्याचा प्रकार मला आधी सुमारपणाचे लक्षण वाटत होते. पण चांगला टाईमपास होतो. अनुवादही प्रयत्नपूर्वक चांगले बनविले आहेत. धन्यवाद

परखडपणे मत मांडल्यामुळे प्रोत्साहन मिळाले. भाषांतर करताना मी कधीही सुमारपणा करीत नसतो. तसा करणे शक्यही नाही. मुळात असे सुमार गाणे असणेही शक्य नाही. आपल्याला कितही फालतू गाणे वाटले तरी ते लिहिणाऱ्याला आणि संगीतकाराला महत्त्वाचेच असते, त्याशिवाय ते इतके प्रोफेशनल होणारच नाही. भाषांतराला सगळी गाणी अवघडच असतात. फक्त काही जास्त अवघड असतात  आणि काही अशक्य असतात  

भाषांतर करताना मी प्रथम तंतोतंत भाषांतर आणि यमके हे जमणार की नाही ते बघतो. नंतर वृत्त आणि चाल आणि नंतर इतर क्वालिटी वगैरे. त्यामुळे वाचणऱ्याला सुमार वाटणे / उच्च वाटणे दोन्ही शक्य आहे.

आपल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल पुन्हा धन्यवाद.