@सुधीर
ज्यांनी छळ केला त्यांना सश्रद्ध तरी कसे म्हणावे? माझ्या मते सश्रद्ध माणूस असा की जो माणसातील माणूसपणावर आणि त्याच्या माणूसपण ओलांडून दिव्यत्वाकडे जाण्याच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवतो. चराचरांतील चेतनेलाही दिव्य मानतो. असा सश्रद्ध माणूस दुसऱ्या माणसाचा कसा बरे छळ करेल? तुम्ही म्हणता ती माणसे संकुचित विचारांनी ग्रासलेली होती आणि आजही अशी माणसे जगात दिसतात, जी आपल्या ''श्रद्धा'' जपताना इतरांच्या श्रद्धा पायदळी तुडवतात. त्यांना मी खऱ्या अर्थाने सश्रद्ध मानत नाही. सश्रद्ध तो, जो माणुसकीवर विश्वास ठेवतो, माणसातील चांगुलपणावर विश्वास ठेवतो. मग रुढार्थाने तो देवावर विश्वास ठेवो अगर ना ठेवो. त्या दृष्टीने पाहू गेल्यास छळ करणारे लोक सश्रद्ध होते असे म्हणणे फारच उदारमतवादी ठरेल!