मालक (नोकराला)- काय रे दोन दिवसात तु बागेत आजिबात पाणी घालताना दिसला नाहीस.
नोकर- साहेब, दोन दिवस जोरात पाऊस नव्हता का पडत!
मालक- हो, माहितेय मला. लेको, तुम्ही हल्ली फार कामचुकार होत चाललायत. नुसती कारणं सांगायला हवीत. एखादा असता तर छत्री घेऊन पाणी घालायला गेला असता!