ज्याला इंग्रजीत पिन-पॉंईंट म्हणतात, ते.
मला वाटते ज्ञानभाषा इतक्या जास्त प्रमाणात शिकल्या जाते की तिच्यावर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळते, पण एक भाषा म्हणून शिकल्या जाणाऱ्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे कष्टाचे जात असावे. किमान माझातरी असाच अनुभव आहे.
पण इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांचे इंग्रजी चांगले असेलच असेही नाही. कधीकधी इदं च नास्ती परं न लभ्यते (हे ही नाही अन तेही नाही) प्रमाणे ना धड मराठी न धड इंग्रजी अशीही परिस्थिती होवू शकते.

पण ज्ञानभाषा मातृभाषाच असावी असं मला वाटते, जेणेकरून संकल्पना समजणे सोपे जाईल. वाटल्यास तांत्रिक शब्द इंग्रजी ठेवले तरी चालतील पण मातृभाषेतूनच शिक्षण असावे. म्हणजे मराठीचा लळा लागेल. अन्यथा आमिरखान (आणि अनेक) सारखे इंग्रजी बोलता येते पण मराठी एक विषय असूनही बोलता येत नाही, असे होईल

अर्थात उलट उदाहरणेही असतील, पण विरळ

चांगल्या विषयासाठी पुन्हा एकदा अभिनंदन